Sunday, March 17, 2013


निषेध! निषेध! निषेध !
प्रा.सोपानराव जगताप ह्यांचा मनसे शाखा नांदगाव तर्फे तीव्र निषेध.
प्रा.सोपानराव जगताप ह्यांनी “ तारापूर समाचार” ह्या साप्ताहिक मध्ये “ जिंदाल जेटी संदर्भात जिंदाल कंपनीच्या बाजूने असणारा व नांदगाव व आजूबाजूच्या परिसराचा जराही आभ्यास व माहिती नसताना
एकांगीपणे लेखन केले आहे.त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नांदगाव च्या वतीने त्या साप्ताहिकाची होळी करण्यात आली व प्रा.सोपानराव जगताप ह्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
जिंदल कंपनीने अशा प्रकारे समाजात गैरसमज पसरविण्यासाठी अशा लोकांना व काही साप्तहीकाना कुठली लालूच दाखविली आहे ते माहित नाही पण काही लोक त्यासाठी ते करून स्थानिक लोकांचा विश्वासघात करीत आहे.जयगड येथील प्रकल्पाची तुलना येथील प्रकल्पांशी करणे मुळातच चुकीचे आहे.तेथील परिस्तिथी संपूर्ण वेगळी आहे.तरी अशा सर्व लोकांचा पुन्हा एकदा तीव्र निषेध.लिखाण करतांना सामजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन लेखन करीत चला.आम्हांस असे वाटते हा लेख लिहणारे येथील स्थानिक नसावेत,ते जर इकडले असते तर त्यांना ह्या मातीचा कळवळा असता.अशा साप्ताहिक व लेखामुळे ग्रामस्थांनी गैरसमज करून घेऊ नये हि विनंती.... जय शिवाजी! जय महारष्ट्र ! जय मनसे !
 

No comments:

Post a Comment